पुणे महानगरपालिका
आयोजित

वारी वेशभूषा स्पर्धा २०२६

विद्यार्थ्यांसाठी वारीच्या संस्कृतीचा सर्जनशील उत्सव !!!

आषाढी पालखी सोहळ्याच्या या पावन पर्वावर, आपल्या घरातील चिमुकल्यांना वारकरी संप्रदायाच्या समृद्ध संस्कृतीची गोडी लागावी म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत 'बाल वारकरी वेशभूषा स्पर्धा'.

तुमच्या लाडक्या पाल्याला लाडका विठूराया, माउली रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम किंवा एका सुंदर वारकऱ्याच्या पारंपरिक वेशभूषेत सजवा. त्यांचा वारीचा उत्साह कॅमेऱ्यात कैद करा, फोटो आमच्या पोर्टलवर अपलोड करा आणि जिंका महापालिकेतर्फे भव्य रोख बक्षिसे! चला, आपल्या पुढच्या पिढीला वारीचे संस्कार देऊया!

स्पर्धेचा कालावधी: ५ जुलै २०२६ पासून प्रवेशिका स्वीकारणे सुरू होईल आणि ३१ जुलै २०२६ रोजी प्रक्रिया समाप्त होईल.
1.विद्यार्थ्याचे नाव (Student's Name):(Required.)
2.पत्ता (Address):(Required.)
3.पालकांचे नाव (Parent's Name):(Required.)
4.पालकांचा मोबाईल क्रमांक (Parent's Mobile Number):(Required.)
5.शाळेचे नाव (School's Name):(Required.)
6.वय गट (Age Group):(Required.)
7.फोटो अपलोड (Upload Photo)(Required.)
No file chosen
नियम व अटी -
  1. सदर स्पर्धा केवळ ० ते १६ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली राहील.
  2. नोंदणी करताना विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, पालकांची संपर्क माहिती इत्यादी तपशील योग्य भरणे आवश्यक आहे.
  3. वारी संकल्पनेवर आधारित वेषभूषेमधील विद्यार्थ्याचा स्पष्ट व अलीकडील (Recent) फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.
  4. पोशाख व सादरीकरण वारी, वारकरी संस्कृती, संत परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती किंवा सामाजिक संदेशाशी संबंधित असणे अपेक्षित आहे.
  5. चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास प्रवेशिका रद्द केली जाऊ शकते.
  6. प्रत्येक विद्यार्थ्यास एकच प्रवेशिका सादर करता येईल.
  7. प्रवेशिकांचे परीक्षण पोशाखाची कल्पकता, विषयाशी संबंधितता, सादरीकरण व एकूण प्रभाव या निकषांवर केले जाईल.
  8. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम व सर्व सहभागींसाठी बंधनकारक राहील.
  9. सहभागी विद्यार्थ्यांच्या फोटो व माहितीचा वापर पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत प्रचार व जनजागृती माध्यमांसाठी केला जाऊ शकतो.
  10. स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा किंवा कोणतीही प्रवेशिका नाकारण्याचा अंतिम अधिकार पुणे महानगरपालिकेकडे राहील.
  11. छायाचित्र स्पष्ट, स्वतः काढलेले व योग्य स्वरूपात (JPG, PNG) असणे आवश्यक आहे.
Privacy & Cookie Notice