पुणे महानगरपालिका
आयोजित

वारी चित्रकला स्पर्धा २०२६

बालमित्रांच्या रंगांतून साकारणार वारीचे रूप!

आषाढी पालखी सोहळ्याचे हे पावन पर्व आपल्या पुढच्या पिढीसाठी संस्कारांची शिदोरी ठरावे, म्हणून 'सेवा वारी' अंतर्गत आम्ही घेऊन आलो आहोत 'कलावारी शालेय चित्रकला स्पर्धा'. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार, भक्तीभाव व सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चला, आपल्या मुलांच्या कल्पकतेला आणि रंगांना संतांच्या विचारांची जोड देऊया!

स्पर्धेची तारीख: ही स्पर्धा दिनांक ३ जुलै २०२६ रोजी (शालेय वेळेत) पुण्यातील सर्व संबंधित मनपा आणि खाजगी शाळांमध्ये प्रत्यक्ष आयोजित केली जाईल.

स्पर्धेचे विषय (Themes): वारी या विषयावर कल्पकतेने चित्र काढणे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालकलाकारांना पुणे महानगरपालिकेतर्फे 'डिजिटल सहभाग प्रमाणपत्र' दिले जाईल, जे स्पर्धेनंतर थेट याच पोर्टलवरून डाऊनलोड करता येईल.
1.विद्यार्थ्याचे नाव (Student's Name):(Required.)
2.पत्ता (Address):(Required.)
3.पालकांचे नाव (Parent's Name):(Required.)
4.पालकांचा मोबाईल क्रमांक (Parent's Mobile Number):(Required.)
5.शाळेचे नाव (School's Name):(Required.)
6.विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार स्पर्धेचे गट:(Required.)
Privacy & Cookie Notice